आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत.सदर अनूदिनी मध्ये आपल्याला सेट,नेट विविध स्पर्धापरीक्षा,पदवी,पदव्युत्तर,पीएचडी याकरिता व्यावसाईक समाजकार्य संदर्भात उपयुक्त अशी माहिती मिळेल

Saturday, March 24, 2018

महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

*#MPSC महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018 अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि  तयारीची दिशा#*

          *प्रस्तुत लेखात महिला व बालविकास अधिकारी गट ब परीक्षा अभ्यासक्रम,24 जाने 2016 च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण,
अभ्यासक्रमातील घटक व तयारी करतांना कोणत्या घटकांचा अभ्यास करावा याची माहिती देण्यात आली आहे.*

*#परीक्षेचे अर्ज  भरण्याचा कालावधी20 मार्च 2018 ते 9 एप्रिल 2018 या कालावधीत भरावयाचे आहेत#*

*रिक्त पदे-45*
           या परीक्षेतून निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, अधिव्याख्यता, महिला व बालविकास अधिकारी,अधीक्षक, सांख्यिकी अधिकारी पदांची भरती केली जाणार आहेत.
      
*पात्रता :- पदवीधर*

*परीक्षा स्वरूप व निवड* :-
       परीक्षेसाठी एकच पेपर 200 मार्कांचा असून त्यात  100 प्रश्न विचारले जातात आणि मुलाखत 50 गुणांची असते,अंतिम निवड लेखी परीक्षा व मुलाखत यांच्या एकूण गुणांवर आधारित होते

*वेळ :- एक  तास*

*#अभ्यासक्रम घटकांचे विश्लेषण आणि 24 जाने.2016 रोजीच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेले एकूण प्रश्न संबधित अभ्यासक्रम घटकाच्या समोर (  )मध्ये दर्शविले आहेत.#*
         आयोगाने या परीक्षेचा अभ्यासक्रम वेबसाइटवर 11 सप्टेंबर 2015 रोजी प्रकाशीत केला आहे, यामध्ये साधारणपणे 13 घटक आहेत.या अभ्यासक्रमानुसार 24 जाने 2016 रोजी परीक्षा घेण्यात आली,त्यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.

*१.सामान्य अध्ययन(5 प्रश्न)*- यामध्ये पुरस्कार, निवडणूक, साहित्य, क्रीडा घडामोडी, चर्चेतील व्यक्ती इत्यादींवर प्रश्न विचारले जातात.
*२.बुद्धिमत्ता व अंकगणित(10प्रश्न)*-यामध्ये वेन आकृती, तर्क अनुमान, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, कूट प्रश्न, गुणोत्तर, भूमितीय प्रश्न विचारले जातात.
*३.मराठी व इंग्रजी व्याकरण(8प्रश्न)*
    - यामध्ये परिच्छेद आधारित मराठी 4 प्रश्न व इंग्रजी 4 प्रश्न विचारण्यात आले होते, तसेच काही प्रश्न व्याकरण यावरही विचारले जाऊ शकतात.
*४.सामान्य विज्ञान (7प्रश्न)*- यामध्ये भोतीकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र यावर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.
*५.समाजशास्त्र(5प्रश्न) व मानसशास्त्र(5प्रश्न)*-  समाजशास्त्रामध्ये समाज अर्थ, व्याप्ती व वैशिष्ट्ये, सामाजिक परिवर्तन, सामाजिक संशोधन, नमुना निवड इत्यादींवर प्रश्न विचारले जातात.
          तर मानसशास्त्रात अध्ययन उपपत्ती, संकल्पना, स्मृती, धारणा, विचारप्रक्रिया, दृष्टीकोन इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*६.माहिती तंत्रज्ञान(5प्रश्न)*-
         यामध्ये इंटरनेट बेसिक संकल्पना, ईमेल, इकॉमर्स, संगणक विस्तारित रूपे यावर प्रश्न विचारले जातात.
*७.समाजकार्य(10प्रश्न)*-
         यामध्ये समाजकार्य अर्थ, वैशिष्ट्ये, तत्वे, पद्धती,संस्था स्थापना, संशोधन, समाजसुधारक कार्य इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
*८.भारतीय संविधान(7प्रश्न)*-
         यामध्ये राज्यघटना प्रास्ताविक,  महत्वाची कलमे, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत रचना, संसद इत्यादींवर प्रश्न विचारले जातात.
*९. मानवी हक्क(6प्रश्न)*-
         यामध्ये मानवी हक्क अर्थ ,व्याप्ती व जाहीरनामा, मानवी हक्क कायदेव करार, सहस्त्र विकास उद्दिष्ट्ये यावर प्रश्न विचारले जातात.
*१०.महिला व बालविकास योजना(7प्रश्न)*
        यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या योजना उदा.पोषण आहार योजना,वन स्टॉप योजना इत्यादी., महिला व बालक यांच्याशी संबंधित आयोग इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात
*११.महिला व बालक कायदे(10प्रश्न)*
       यामध्ये माहितीचा अधिकार कायदा, अनेतिक व्यापार प्रतिबंध कायदा, बालन्याय कायदा, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, कोंटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, नागरी हक्क संरक्षण कायदा इत्यादींवर प्रश्न विचारले जातात.
*१२.गृहविज्ञान(8प्रश्न)*-
     यामध्ये जीवनसत्वे, प्रथिने, आहार, विविध आजार,लहान बाळाचे पोषण, पोषण विषयक संस्था इत्यादींवर प्रश्न विचारले जातात.
*१३.बाल व महिला विकास(7प्रश्न)*
         यामध्ये बालकाचा जन्मपूर्व व जन्मोत्तर विकासाच्या विविध अवस्थांची शारीरिक, मानसिक, भावनिक वैशिष्ट्ये,शासनाचे बालविकासाशी संबंधित उपक्रम, चाइल्ड केअर सेंटर इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.

*परीक्षेच्या तयारी करिता अतिशय महत्वाची संदर्भ पुस्तके*

१.महिला व बालविकास घटक - के सागर (सातवी आवृत्ती)
२. महिला व बालविकास अधिकारी घटकनिहाय 2700 वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती), के सागर प्रकाशन
३.संपूर्ण महिला व बालविकास अधिकारी(विश्लेषणात्मक स्वरूपात)- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे, के सागर प्रकाशन
४.महिला व बालविकास ११ सराव प्रश्नपत्रिका(24 जाने.2016 च्या प्रश्नपत्रिका उत्तरांसह) - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे, के सागर प्रकाशन
५.महिला व बालविकास 11 आदर्श सराव प्रश्नपत्रिका - विनायक घायाळ, के सागर प्रकाशन
६.व्यावसायिक समाजकार्य - डॉ.प्राजक्ता टाकसाळे
७.समग्र मानवी हक्क - के सागर
८.समाजकार्य वस्तुनिष्ठ स्वरूपात - डॉ. प्राजक्ता टाकसाळे
९.महाराष्ट्रातील समाजसुधारक- के सागर
१०.बालमानसशास्त्र (बालविकास व मानसशास्त्र घटकासाठी)- डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती)
११.संगणक व माहिती तंत्रज्ञान - प्रा. हेमंत देव
१२.बुद्धिमत्ता चाचणी - के सागर, डॉ.अनिरुद्ध, अनिल अंकलगी, सतीश वसे यापैकी कोणतीही 2 पुस्तके
१३.माहितीचा अधिकार - व्ही बी पाटील, प्रल्हाद कचरे यशदा यांची पुस्तके
१४.मराठी व इंग्रजी उतारे - योगेश नेतनकर
१५.समग्र मानवी हक्क -के सागर
१६.समाजशास्त्र - डॉ.प्रदीप आगलावे
१७.मानसशास्त्र-ycmou पुस्तक
१८.गृहविज्ञान-११ वी पुस्तक किंवा सेठ प्रकाशनचे पुस्तक
१९.सामान्य विज्ञान-कविता भालेराव, अनिल कोलते व चंद्रकांत गोरे यांचे पुस्तक.

- टेलेग्रामवरून साभार

No comments:

Post a Comment

>