प्रतिबंधात्मक औषधे...
औषधांचे वर्गीकरण:
औषधांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक तर्हा आहेत: त्यांच्या रासायनिक गुणधर्मानुसार , औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार, औषधाचा प्रभाव दिसणाऱ्या शरीरसंस्थेनुसार, औषधयोजनेचे परिणाम इत्यादी अनेकविध तर्हांनी औषधांची वर्गवारी करता येऊ शकते.
औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार वर्गीकरण :
औषधांचे ती घेण्याच्या वहनमार्गानुसार अनेक प्रकार आहेत.
अ. तोंडावाटे घेण्याची औषधे : सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा प्रकार आहे. हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. परंतु काही वेळा ; जसे रोगी शुद्धीवर नसल्यास, त्याला जुलाब होत असतील तर किंवा औषध पोटातील आम्लामध्ये विघटीत होत असेल तर हा मार्ग वापरता येत नाही.औषधाची गोळी ही गोल, लंबगोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांत आणि रंगांमध्ये उपलब्ध असते. ही सहसा पाण्याबरोबर गिळली जाते. परंतु, चघळण्याची , आधी विरघळवून घ्यायची असेही प्रकार आहेत.
ब. डोळ्यावाटे घेण्याची औषधे: सहसा डोळ्याच्याच विकारांसाठी असतात व त्यातील बव्हंश औषधांमध्ये निर्जंतुकीकरण करणारे औषधही असते.
क.शीरेवाटे घेण्याची औषधे:
ड.त्वचेला लावण्याची औषधे
इ . श्वसनमार्गे घेण्याची औषधे
ई. नाकावाटे घेण्याची औषधे
उ . कानावाटे घेण्याची औषधे
ऊ. गुदद्वारामार्गे आणि योनीमार्गे घेण्याची औषधे
औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा नियंत्रित वापर होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य औषधे, योग्य रुग्णास, योग्य मात्रेत दिल्यानंतर ती योग्य मार्गाने, योग्य कालावधीसाठी वापरणे अपेक्षित असते.
No comments:
Post a Comment