आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत.सदर अनूदिनी मध्ये आपल्याला सेट,नेट विविध स्पर्धापरीक्षा,पदवी,पदव्युत्तर,पीएचडी याकरिता व्यावसाईक समाजकार्य संदर्भात उपयुक्त अशी माहिती मिळेल

Thursday, April 4, 2019

Important NTA NET Book List

Important NTA NET Book List Must Refer :

Exam time is the most stressful time for students as they face too much mental pressure of qualifying the exam with good scores. The candidates preparing for NTA NET must also be looking for preparation tips to get motivated and encouraged in achieving NTA NET Scorecard.
It is advised to all the aspirants that they must keep these tips in their mind while preparing for the exam.
  1. Note down your Syllabus
  2. Refer Good Books
  3. Prepare Notes
  4. Try to Teach Someone
  5. Time Management
  6. Stay Updated
  7. Revision and Self Analysis
  8. Take help of Solved Papers and Online Mock Test Papers
  9. Boost your Confidence Level

Some essentials NTA NET and CSIR NET study materials:Top Selling Books:


We really hope your preparation is going on well. Do share your valuable feedback with us.
Click on the subject link you want to download.
& buy the book,
We will help you in buying the book.

Wednesday, August 22, 2018

UGC NET December 2018: Exam pattern, eligibility, syllabus, dates...

New Delhi: National Testing Agency, NTA would be conducting the UGC NET December 2018 examination. As per the official press released, the online application forms for UGC NET 2018 December exam would begin from September 1, 2018. The examinations would be conducted over a period of 8 days and would begin from December 9 to December 23 in online mode. The registrations would begin on the official website nta.ac.in and not on cbsenet.nic.in.
Candidates interested in applying for the examination to please note that the conducting agency for UGC NET examinations has been shifted from CBSE to NTA from this year onwards. Also, with the change, a few changes have been made while many aspects of the examination have remained constant. Summarized below are a few things that you need to keep in mind while applying for UGC NET December 2018 examination. 

1. Eligibility and syllabus for the UGC NET 2018 December examination would remain the same under NTA. Candidates can check the eligibility and the age limit for UGC NET 2018 December examination on the official website of nta.ac.in. Direct link to UGC NET page on NTA website is also provided here.
2. The exam pattern for UGC NET 2018 December would change. The examination would now be an objective or multiple choice based Computer Based Test or CBT. Mock tests are expected to be made available soon.
3. NTA has released the schedule for UGC NET December 2018 examination. The registration process would begin from September 1, 2018 and would end on September 30, 2018. The examination schedule is provided below.
Online registration:              1  Sept. 2018 – 30 Sept. 2018
Release of Admit Card:      19  Nov. 2018
Date of Exam:                      18  Dec. 2018 – 23 Dec. 2018
Result Date: 10  Jan. 2018
4. Candidates would have an option of appearing for any of the dates. The option to choose the date of the examination would be provided at the time of filling of the online application form.
5. Please note that the examination would continue to be conducted in all the languages and subjects as it was conducted under CBSE. The eligibility criteria also remains the same. Vacancy details for JRF, however, would be notified at the time of release of the online application forms for UGC NET December 2018 examination.

Monday, April 23, 2018

माथाडी कामगार...



Mathadi Kamgar
"माथा" म्हणजे डोके. ओझे वाहून नेण्यासाठी डोक्याचा वापर करणे म्हणजे माथाडी.माथाडी कामगार ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे. अशासारखी अन्य कामे करतात. डोक्यावरून ओझे वाहून नेणा-या कामगारास माथाडी कामगार म्हणतात.महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार(नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ३४ माथाडी बोर्ड आहेत. 
                                                                     हमाल व माथाडी कामगार यांना योग्य वेतन आणि अटीनुसार कामाच्या अन्य सुविधा मिळत नव्हत्या. मालकांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत.१९६६ मध्ये कै.माननीय आण्णा साहेब पाटील यांनी माथाडी कामगार व मुंबई मधील इतर बाजारातील त्याच्या नेत्यांना एकत्र केले. माथाडी कामगार यांनी कायद्याच्या एका भागात यावे अशी मागणी केली.खूप दिवसाच्या संघर्षानंतर आणि समितीने दिलेल्या अहवालाचा विचार करता,महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील यासाठी कायदा बनविला तो नियम म्हणजेच महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार(नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.
                                     या कायद्याच्या अंतर्गत खूप योजना येत आहेत.किराणा दुकाने, कागद, लोखंड व पोलाद, कापड, भाजीपाला, वाहतूक, रेल्वे, साफसफाई इ. हे कायदे लागू झाल्यावर माथाडी कामगारांनी प्रत्येक महिन्याला मंडळाकडून मासिक वेतन मिळायला लागली.्याबरोबर भविष्य निर्वाह निधी, उपदान, व वैदकीय लाभ, बोनस, सुट्टी वेतन इ. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात बदल झाला.मुबई, पुणे, ठाणे, रायगड येथील माथाडी कामगार हे स्वतःच्या घरात राहू लागले.जे कि शासनाने त्यांना विशेष योजने मध्ये दिली आहेत.

Sunday, April 22, 2018

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF)...

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत "धोकादायक आपत्तीची स्थिती किंवा आपत्तीची प्रतिक्रीया" यासाठी "विशेष प्रतिसाद देण्याच्या हेतूने" एक विशेष शक्ती आहे. "आपत्ती व्यवस्थापन सुप्रीम बॉडी" भारताची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आहे. एनडीएमएचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत.

भारताच्या संघीय यंत्रणेतील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. नैसर्गिक आपत्तींच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारमधील 'नोडल मिनिस्ट्री' हे गृहमंत्रालय (गृह मंत्रालय) आहे.

जेव्हा 'गंभीर निसर्गाच्या आपत्ती' उद्भवतात, तेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारच्या विनंतीवर, सशस्त्र दल, केंद्रीय अर्धसैनिक बलों, राष्ट्रीय आपत्ती निवारक दल (एनडीआरएफ) च्या सहाय्याने, नियुक्त केलेल्या राज्यांना मदत आणि मदत देण्यासाठी जबाबदार आहे. संप्रेषण, हवाई आणि इतर मालमत्ता, जसे उपलब्ध आणि आवश्यक आहेत

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत आहे. एनडीआरएफचे प्रमुख महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. एनडीआरएफचे महानिरीक्षक आयपीएस अधिका-यांवर भारतीय पोलिस संघटनेच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. महानिरीक्षक एक समान आणि तिसरे स्टार जनरल ऑफिसचे बॅज वापरतो.

एनडीआरएफ हे एक उच्च-अवजड संघटना आहे. याशिवाय महानिरीक्षकां व्यतिरिक्त अनेक इन्स्पेक्टर जनरल (आयजी) आणि उप आयजीज आहेत.

*आपत्तीचा प्रतिसाद*

एनडीआरएफने डेंगिंग प्रकरणे, इमारत कोसळले, भूस्खलन, विनाशकारी पूर आणि चक्रव्यूहा यासह विविध आपत्तींच्या काळात आपल्या कार्यप्रदर्शनासह त्याची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. एनडीआरएफने देशभरात 1,33,192 मानवी जीवन वाचले आणि 276 मृतदेहांच्या मृतदेहांचे 73 प्रतिसाद ऑपरेशनमध्ये पुनर्प्राप्त केले. खालील प्रमाणे एनडीआरएफच्या प्रमुख प्रतिसाद ऑपरेशन:

*2007*

भावनगर, गुजरात येथे पूर - 3-5 जुलै 2007 - सुटका 291 लोक; 3,750 खाद्य पॅकेट वितरित केले

राजकोटमध्ये पूर, गुजरात - 3-5 जुलै 2007 - 291 लोकांची सुटका; 3,750 खाद्य पॅकेट वितरित केले

*2008*

अहमदाबाद, गुजरातमध्ये इमारत कोसळून (हॉटेल शकुंत) - 3-5 फेब्रुवारी 2008 - 10 जणांना वाचवले आणि 6 मृतदेह ताब्यात घेतले.

लखिमपूर, आसाम मध्ये पूर - 14 जून - 20 जुलै 2008 - 2500 नागरिकांना सुटका.

धेमाजी, आसाम मध्ये पूर - 16 जून - 31 जुलै 2008 - 600 लोकांना वाचवले.

लखिमपूर, आसाम मध्ये पूर - 21 जुलै - 4 ऑगस्ट 2008 - 2000 लोकांच्या निर्वासित.

Saturday, April 21, 2018

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना...

प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकाऱ्यासह (नोडल ऑफिसर ) नागरी पूर/ पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने खालील परिस्थिती विचारात घेऊन नागरी पूर व्यवस्थापन आणि उपसक्षम यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) लागू करावी. किनारवर्ती शहरे, मुख्य/मोठ्या नदी किनाऱ्यावरील शहरे, धरणाजवळील/ जलाशयाजवळील शहरे, अंतर्गत शहरे, डोंगराळ प्रदेशातील शहरे, शहरांना वरीलप्रमाणे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये असू शकतात.
नागरी पूर व्यवस्थापनासाठी सर्व भागीदारांची क्षमता बांधणी व उत्तम समन्वयासाठी मान्सूनपूर्व कार्यशाळेचे आयोजन करणे. माहिती जनसंपर्क आणि शिक्षण, प्रत्येक शहराने पूर्व तयारीसह स्थानिक कल्याणकारी प्राधिकारी किंवा अन्य समाज गटांची प्रभागनिहाय यादी तयार ठेवावी व संपूर्ण शहरासाठी त्याचे सहाय्य घेणे. मान्सूनचे आगमन होण्याच्या बऱ्याच कालावधीपूर्वी शहरातील जलाशयांच्या पाण्याचे शुद्धीकरण तसेच गटारांमधील गाळ प्रभावीपणे काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे. प्रत्येक शहरातील पाण्याच्या साठ्यांच्या स्थितीचे व मालकी हक्काचे सूचीकरण व मॅपिंग (Mapping) करणे. शहरातील पूर परिस्थितीजन्य भागातील पाण्यावर उपसा करण्यासाठी पंप बसविणे. विमानतळ असणाऱ्या शहराच्या समन्वय अधिकाऱ्याने पावसाच्या सद्यस्थिती व भाकितासंबंधीच्या स्थितीबरोबरच चक्रीवादळ व अतिवृष्टीची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (IMD) घेणे आवश्यक आहे.
ही माहिती METARS या संस्थेकडून दर 30 मिनिटांनी अद्ययावत करण्यात येते. जेव्हा चक्रीवादळ व अतिवृष्टीची स्थिती असते, तेव्हा ही माहिती महानगरपालिकेच्या आयुक्तांना तातडीने कळविणे गरजेचे असते. जेणेकरून ते सावधानता बाळगून त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करतील. उदा. पूरग्रस्त व अतिवृष्टी क्षेत्रातील शाळा बंद करणे. जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जागेवर घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक शहरासाठी पुरेसे अधिकार असणाऱ्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना करणे, सदर समितीला अतिवृष्टीच्यावेळी पाण्याच्या विसर्गाच्या भाकिताचा आढावा घेऊन जलाशयाची/धरणाची द्वारे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याचे अंतिम अधिकार राहील. जलाशयातून/धरणातून पाण्याचा विसर्ग केला असता शेजारील राज्यांना ती माहिती त्याचवेळी देणे. प्रत्येक राज्य/जिल्हा प्राधिकरणाने धोका नकाशा तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करता येईल.
वज्राघात-काय करावे व काय करू नये
सतर्कतेची चिन्हे/ चेतावणी चिन्हे : अति वेगवान वारे, अति पर्जन्य आणि काळे ढग घोंगावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात, जास्त किंवा अधिक प्रमाणात मेघगर्जना
वस्तुस्थिती - वीज ही सामान्यपणे उंच वस्तूंवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही. काही स्थाने इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत. मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरची वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. वज्राघात बाधीत / जखमी व्यक्तिस तुम्ही मदत करू शकता त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकाराचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्या व्यक्तीस तत्काळ / त्वरीत मदत करावी.
काय करावे (Dos)
पूर्व तयारी
वज्राघातापासून बचावासाठी भित्तीचित्रे/भित्तीपत्रके प्रदर्शित करा. आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा. स्वत:साठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय व स्थानिक आपात्‍कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे. आपत्कालीन साधने (Emergency Kit) तयार ठेवा. जर गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर / घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रीक व इलेट्रीकल वस्तू आणि वातानुकुलीत यंत्रे बंद ठेवावेत. आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकाव्यात.
तुमचा परिसरात वादळी वारे (गडगडाटी वारे)/विजा चमकत असल्यास
घरात असल्यास- घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा. घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच रहावे.
घराबाहेर असल्यास- त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमरतीकडे) प्रस्थान करावे. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहा. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणी वगळून लावाव्यात. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यत: खिडक्या बंद असलेल्या, धातूपासून तयार झालेली वाहने (बस, मोटार) चांगली आश्रय स्थळे होऊ शकतात. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यांवर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यावर मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्‍या विद्युत तारापासून दूर रहा. जंगलामध्ये दाट लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागांवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.( परंतू अचानक येणाऱ्या पुरापासून सावध रहा) जर जमिनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शाधून काढा.
वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास- त्वरीत रूग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तिस त्वरीत वैद्यकिय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत, इजळाला (बाधित व्यक्तिी) व जमिनीच्यामध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermia/ शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.
खालीलप्रमाणे इजा झालेल्या इसमास हाताळा :
श्वसन बंद असल्यास- तोंडावाटे पुनरुत्थान ( Mouth to Mouth) प्रक्रिया अवलंबावी.
हृदयाचे ठोके बंद असल्यास- कुठलीही वैद्यकिय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR चा वापर करून सुरू ठेवा.
इजाळाची/रुग्णाचा श्वास व सुरु नसल्यास- इतर दुखापतीसाठी/आघातांसाठी तपासणी. (भाजणे/ऐकू न येणे न दिसणे)
काय करू नये (Don’ts )
तयारी
गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे रेल्वे/बस/सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणीची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्याचे खांब, धातुचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे.
घरात असल्यास- वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रीक/इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, (अशा आपत्कालीनवेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे) यादरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, ही कार्ये करु नयेत. क्राँक्रीटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्‍ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग व प्लंबींग/नळ).
घराबाहेर असल्यास- मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या/लोंबकळणाऱ्या केबलपासून लांब रहा.
अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा.
-संकलन- जिल्हा माहिती अधिकारी, पालघर.

Thursday, April 19, 2018

भारतातील सार्वजनिक आरोग्य प्रशासन...

भारतातील आरोग्य हा राज्यघटनेनुसार राज्यसूचीमधील विषय आहे. केंद्र शासन आरोग्यसंदर्भात नियोजन, मार्गदर्शन,  साहाय्य व समन्वय ही भूमिका पार पाडत असते.

कुटुंबकल्याण मंत्रालय – आरोग्य व कुटुंबनियोजनासंदर्भात देशातील ही सर्वोच्च कार्यकारी यंत्रणा आहे. या मंत्रालयाचा प्रमुख हा कॅबिनेट स्तरावरील मंत्री असतो, त्याला साहाय्य करण्यासाठी राज्यमंत्री व उपमंत्रीदेखील असतात. या मंत्रालयाच्या अंतर्गत खालील विभाग येतात – आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग, आरोग्य संशोधन विभाग, आयुष  विभाग (Ayush), एड्स नियंत्रण विभाग.

या सर्व विभागांचा प्रमुख म्हणून सचिव नेमले जातात. या सर्व विभागांत सुसूत्रता निर्माण होण्यासाठी, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयास तांत्रिक साहाय्य करण्यासाठी, आरोग्य सेवा संचालनालय स्थापन करण्यात आले आहे. आरोग्य संचालनालयाचा प्रमुख हा महासंचालक असतो. राज्यस्तरावर आरोग्याची जबाबदारी, राज्य आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाची असते. याचा प्रमुख हा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो.

भारताची वैद्यकीय परिषद (Medical Council of India MCI ) – भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९३३ नुसार, टउक ची स्थापना १९३४ साली करण्यात आली व पुढे १९५६ मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला वैधानिक दर्जा देण्यात आला. याचे प्रमुख कार्य म्हणजे मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रतेच्या डॉक्टरांच्या तात्पुरत्या व नियमित नोंदणीला मान्यता देणे, तसेच बाहेरील देशांबरोबर वैद्यकीय निकषांच्या मान्यतेच्या बाबतीत समन्वय प्रस्थापित करणे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra Medical Council- MMC) – या संस्थेची स्थापना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ या राज्याच्या अधिनियमाद्वारे झाली. या परिषदेचे काम लोकशाही तत्त्वाने चालते. आधुनिक वैद्यकशास्त्रातील पदवीधरांची नावनोंदणी करणे हे तिचे प्रमुख कार्य आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ – या विद्यापीठाचे मुख्यालय नाशिकला असून याची स्थापना ३ जून १९५८ रोजी झाली. डॉ. अरुण जामकर हे या विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू आहेत.

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था :- महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेची रचना ही त्रिस्तरीय आहे. प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केद व उपकेंदे येतात.

१) उपकेंद्र (Sub Centre) :- सर्वसाधारणपणे जेथे लोकसंख्या तीन हजार ते पाच हजार आहे येथे हे उपकेंद्र असते. या उपकेंद्रावर एका महिला आरोग्य कार्यकर्तीची नेमणूक करण्यात येते. यांना साहाय्यक परिचारिका दायी (ANM) असे संबोधण्यात येते. त्याचबरोबर एक पुरुष व एक महिला आरोग्य साहाय्यक नेमली जाते. प्रत्येकी सहा उपकेंद्रांसाठी एक पुरुष आरोग्य पर्यवेक्षक नेमला जातो.

२) प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) :– साधारणत: सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते. जर लोकसंख्येचा विचार केला तर सर्वसाधारण प्रदेशात ३० हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात २० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी व त्याच्या साहाय्यासाठी १४ निमवैद्यकीय व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते. स्थानिक उद्भवणाऱ्या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेच्या सेवा पुरवणे इ. कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडते.

३) द्वितीय स्तर :- या स्तरावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व तालुक्याच्या ठिकाणी असलेले सामुदायिक आरोग्य केंद्र यांचा समावेश होतो. जिल्हा रुग्णालय हे प्राथमिक व द्वितीय स्तर यांमध्ये दुवा म्हणून कार्य करतात. जिल्हा रुग्णालयाचा प्रमुख म्हणून प्रमुख वैद्यकीय अधिकारी (CMO) काम करतो. महाराष्ट्रात जिल्हा रुग्णालयांबरोबरच उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे.

समुदाय आरोग्य केंद्र (Community Health Centre ) तालुक्याच्या ठिकाणी ही समुदाय आरोग्य केंद्रे असतात. येथे मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध केल्या जातात. येथे किमान चार तज्ज्ञ डॉक्टर ज्यात शल्यचिकित्सक, बालरोगतज्ज्ञ स्त्री रोगतज्ज्ञ तसेच फिजिशियन असतो. येथून रोगी जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला जाऊ शकतो.

४) तृतीय स्तर :- या स्तरावर विशेषीकृत आरोग्य सेवा पुरवल्या जातात. या ठिकाणी हृदयरोग, मेंदूरोग या प्रकारच्या विशेष सेवा उपलब्ध असतात. उदा. (AIIMS   नवी दिल्ली)

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान – ध्येय : सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात खर्च केली जाणारी रक्कम दरडोई उत्पन्नाच्या दोन ते तीन टक्क्य़ांपर्यंत नेणे हा याचा महत्त्वाचा उद्देश होता. हा कार्यक्रम देशभरातील ग्रामीण लोकसंख्येपर्यंत आरोग्य सेवा परिणामकारक पुरविण्यासाठी विशेषत: त्या राज्यांसाठी जेथे आरोग्याच्या सेवांचा अभाव आढळतो.

घटक या अभियानाचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत – कुटुंबकल्याण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, शालेय आरोग्य कार्यक्रम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम तसेच हिवताप, हत्तीरोग, मेंदू ज्वर, चिकनगुनिया इ. रोगांच्या उपचार व नियंत्रणासाठी देशात कार्यक्रम राबवणे. या कार्यक्रमांतर्गत आशा (ASHA) स्वयंसेविका योजना राबविण्यात येतात. त्यांची पात्रता, आदिवासी क्षेत्रात ज्या स्वयंसेविकेची निवड होणार आहे ती आठवी उत्तीर्ण स्थानिक विवाहित महिला असावी. तिचे वय साधारणत: २० ते ४५ या दरम्यान असावे. आदिवासी भागात एक हजार लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविकेची निवड केली जाते. मात्र बिगरआदिवासी भागात आशा म्हणून काम करणारी स्वयंसेविका दहावी उत्तीर्ण विवाहित महिला असावी. तिचे वय २५ ते ४५ यादरम्यान असावे. शहरी भागात १५०० लोकसंख्येच्या मागे एक अशी स्वयंसेविकेची निवड केली जाते.

आशा स्वयंसेविकेची काय्रे – माता व बाल आरोग्याविषयी गावातील स्त्रियांमध्ये प्रबोधन करणे. उदा. प्रसूतिपूर्वी तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या इ. माहिती मातांना देणे तसेच आरोग्य संस्थेतील प्रसूतींमध्ये वाढ करणे. जर गेल्या सात वर्षांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, एनआरएचएम या कार्यक्रमाने आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडून आणला आहे. मात्र या कार्यक्रमांसमोरील बरेच आव्हान कमी झालेले नाहीत.

आरोग्यविषयक महत्त्वाच्या योजना

०    जीवनदायी आरोग्य योजना – दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांसाठी १९९७-९८ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना मेंदूरोग, मूत्रविकार तसेच मज्जारज्जू यांसाठी आíथक साहाय्य दिले जाते. सुरुवातीच्या काळात या योजनेअंतर्गत प्रतिरुग्णास ५० हजार इतके अर्थ साहाय्य दिले जात असे. मात्र ही रक्कम आता २००६-०७ पासून  एक लाख ५० हजार इतकी करण्यात आली आहे. अलीकडे शासनाने कर्करोगाचा समावेश केला आहे. राज्य सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या जीवनदायी रचनेचे पुनर्रचना करून सर्वसमावेशक राजीव गांधी जीवनदायी योजना तयार केली आहे.

०     राजीव गांधी जीवनदायी योजना – ही सुधारित योजना महाराष्ट्र सरकारने २ जुल २०१२ पासून सुरू केली. राज्यातील आíथक दुर्बल घटकांना दुर्धर व गंभीर आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

    या योजनेअंतर्गत पिवळेकार्डधारक म्हणजे दारिद्रय़्ररेषेखालील व केशरी शिधापत्रधारक जे दारिद्रय़रेषेच्या वर आहेत, मात्र ज्यांचे वार्षकि उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीक दीड लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. या योजनेत पात्र लाभार्थीना हेल्थ कार्ड दिले जाईल. ज्यात कुटुंबप्रमुख व सदस्यांची नावे व फोटो असतील. राज्य सरकार लाभार्थीच्या नावे विमा काढणार असून त्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. लाभार्थी कुटुंबाकडून कोणतीही रक्कम स्वीकारली जाणार नाही. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे. ही योजना संपूर्णत: कॅशलेश असून रग्णाला या योजनेअंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही. या योजनेअंतर्गत रग्णालयातील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा, भोजन तसेच एक वेळचा परतीचा खर्च यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतचा फेरतपासणीचा समावेश आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. राज्यातील शासकीय व खाजगी अशी जवळ जवळ १२० रग्णालये यात समाविष्ट झाली आहेत. या योजनेत रुग्णाला रुग्णालयात भरती करताना मदत व्हावी यासाठी आरोग्यमित्र यांची नेमणूक करण्यात आली आहे.

०     जननी बाल ( शिशू) सुरक्षा योजना – राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून बालसुरक्षा योजना राबविली जाते. महाराष्ट्राची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ही योजना एक जून २०११ रोजी सुरू करण्यात आली. भारतात प्रथमच अशा एखाद्या योजनेद्वारे पुढील वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.

       मातांचे वैधानिक अधिकार

०    सर्व शासकीय रग्णालयांत मोफत बाळंतपण सुविधा, सिझेरिअन ऑपरेशनसहित पुरवली जाईल.

०    दवाखान्याच्या कालावधीतील साधारणत: बाळंतपणाच्या वेळेस तीन दिवस व सिझेरिअनच्या वेळेस सात दिवसांपर्यंतचा आहार मोफत देण्यात येईल.

०    सर्व प्रकारची  औषधे, फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, सर्व प्रकारच्या चाचण्या- उदा. रक्त तपासणी, मूत्र तपासणी तसेच सोनोग्राफी मोफत केली जाईल, तसेच अडचणींच्या वेळेस मोफत रक्तपुरवठय़ाची सोय केली जाईल.

आजारी नवजात बालकाचे वैधानिक अधिकार

आजारी नवजात शिशूला- म्हणजे ३० दिवसांच्या आतील शिशूला आवश्यक ते सर्व उपचार, औषधे, आहार, तपासण्या सर्व मोफत दिल्या जातील. त्याचबरोबर मोफत वाहतूक सुविधादेखील उपलब्ध होतील.

    राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

क्षयरोगाचे नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी भारतात १९६२ पासून करण्यात आली. मात्र यात अजूनही अपेक्षित यशप्राप्ती न झाल्याने, केंद्र सरकारने सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली. (Revised National TB Control Programme) या सुधारित कार्यक्रमात लागण झालेल्या रुग्णांना DOTS (Directly Observed Treatment Short Course) द्वारे तपासणी करून ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांच्यावर उपचार केले जातात. उपचारपद्धतीची अंमलबजावणी भारतात २६ मार्च १९९७ पासून करण्यात आली.

बहु औषधी प्रतिकारक्षम क्षयरोग (MDR-TB)  क्षयरोग बरा करण्यासाठी जी DOT पद्धती वापरली जाते किंवा तो बरा करण्यासाठी जी औषधे वापरली जातात, विविध कारणांमुळे काही रुग्णांमध्ये क्षयरोगाचे विषाणू औषधांना दाद देत नाहीत, त्यांनी या औषधांविरुद्ध प्रतिकारक्षमता विकसित केली आहे, म्हणून या प्रकारच्या क्षयरोगाला असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या क्षयरोगावर नियंत्रण मिळविणे हे आव्हान खऱ्या अर्थाने भारतीय वैद्यकीय पद्धतीसमोर आहे. शासनाने क्षयरोग नियंत्रणासाठी २०१२ ते २०१७ हा व्यूहरचनात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्याद्वारे क्षयरोग उपचार सुविधा सर्वांपर्यंत पोहचविण्याचे लक्ष्य आहे.

राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग व पक्षाघात निवारण व नियंत्रण कार्यक्रम –

भारताचा विचार केल्यास वरील आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण भारतात जवळजवळ ४०% आहे. हे आजार ग्रामीण व शहरी दोन्ही भागांत आढळून येतात. आज भारतात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व फेफरे यांचे प्रमाण वाढलेले आढळते. यासाठी उपाययोजना म्हणून भारत सरकारने २०१०-११ पासून   (NPC DCS) हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख भर आरोग्याबाबत जागृती निर्माण करणे. सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणणे तसेच या आजारांच्या संदर्भात लवकरात लवकर निदान व उपचार करणे. हा कार्यक्रम सध्या २१ राज्यांमधील १०० जिल्ह्य़ांमध्ये राबवला जात आहे. या योजनेत खर्चाचे, गुणोत्तर केंद्र आणि राज्य सरकारात ८० : २० असे आहे. वरील १०० जिल्ह्य़ांपकी प्रत्येक ठिकाणी एक हृदयरोगासाठी स्वतंत्र युनिट स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी जीवन सुरक्षा औषधांचा पर्याप्त साठा केला जाईल. याशिवाय कर्करोगाच्या निदानासाठी प्राथमिक व अत्यावश्यक शस्त्रक्रिया केमोथेरपीसारखे उपचार उपलब्ध करून देण्यात येतील. कर्करोगाच्या निदानासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा तसेच मॅमोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच केमोथेरपीच्या रुग्णांना औषधोपचाराचा पुरवठा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम

भारतात जवळ जवळ सहा टक्के रुग्ण मानसिक आजाराने पीडित आहेत, म्हणून १९८२ या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. २००३ मध्ये या कार्यक्रमात काही बदल करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा कार्यक्रम खालीलप्रकारे संपूर्ण देशात राबविला जातो.

०     राज्यांद्वारे चालविले जाणारे मानसिक आरोग्य दवाखान्यांचे आधुनिकीकरण करणे. महाराष्ट्रात असे दवाखाने ठाणे, पुणे, नागपूर, रत्नागिरी या ठिकाणी आहेत.

०     जिल्हा मानसिक आरोग्य केंद्रातील परिस्थिती सुधारणे, महाराष्ट्रात असे जिल्हा मानसिक आरोग्य केंद्र रायगड येथे आहे. तसेच नाशिक, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, रायगड येथे मानसिक आरोग्य वार्ड  सुरू करण्यात आले आहेत.

०    राज्यांद्वारे संचालित, मानसिक आरोग्य दवाखान्यांचे आधुनिकीकरण करणे. १९८२ साली सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. मुंबईच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या अखत्यारीत हे केंद्र सुरू करण्यात आले.               

>