आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत.सदर अनूदिनी मध्ये आपल्याला सेट,नेट विविध स्पर्धापरीक्षा,पदवी,पदव्युत्तर,पीएचडी याकरिता व्यावसाईक समाजकार्य संदर्भात उपयुक्त अशी माहिती मिळेल

Monday, April 23, 2018

माथाडी कामगार...



Mathadi Kamgar
"माथा" म्हणजे डोके. ओझे वाहून नेण्यासाठी डोक्याचा वापर करणे म्हणजे माथाडी.माथाडी कामगार ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे. अशासारखी अन्य कामे करतात. डोक्यावरून ओझे वाहून नेणा-या कामगारास माथाडी कामगार म्हणतात.महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार(नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ३४ माथाडी बोर्ड आहेत. 
                                                                     हमाल व माथाडी कामगार यांना योग्य वेतन आणि अटीनुसार कामाच्या अन्य सुविधा मिळत नव्हत्या. मालकांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत.१९६६ मध्ये कै.माननीय आण्णा साहेब पाटील यांनी माथाडी कामगार व मुंबई मधील इतर बाजारातील त्याच्या नेत्यांना एकत्र केले. माथाडी कामगार यांनी कायद्याच्या एका भागात यावे अशी मागणी केली.खूप दिवसाच्या संघर्षानंतर आणि समितीने दिलेल्या अहवालाचा विचार करता,महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार हे कायद्याच्या एका भागात येतील यासाठी कायदा बनविला तो नियम म्हणजेच महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार(नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.
                                     या कायद्याच्या अंतर्गत खूप योजना येत आहेत.किराणा दुकाने, कागद, लोखंड व पोलाद, कापड, भाजीपाला, वाहतूक, रेल्वे, साफसफाई इ. हे कायदे लागू झाल्यावर माथाडी कामगारांनी प्रत्येक महिन्याला मंडळाकडून मासिक वेतन मिळायला लागली.्याबरोबर भविष्य निर्वाह निधी, उपदान, व वैदकीय लाभ, बोनस, सुट्टी वेतन इ. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात बदल झाला.मुबई, पुणे, ठाणे, रायगड येथील माथाडी कामगार हे स्वतःच्या घरात राहू लागले.जे कि शासनाने त्यांना विशेष योजने मध्ये दिली आहेत.

No comments:

Post a Comment

>